|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » वाळू उत्खनन प्रकरणी तीन वाहनांवर कारवाई

वाळू उत्खनन प्रकरणी तीन वाहनांवर कारवाई 

प्रतिनिधी/ म्हसवड

राऊतवाडी परिसरातील माणगंगा नदी पात्रात अवैधरित्या वाळूचे उत्खनन करुन वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती सातारा गुन्हे अन्वेषण विभागास मिळाली होती. त्यानुसार शुक्रवार 21 डिसेंबर रोजी पहाटे गुन्हे अन्वेषण विभागाने एकूण 8 लाख 74 हजार रुपयेच्या किंमतीची तीन वाहने व 8 ब्रास वाळू जप्त करुन पाचजणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सातारा गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईमुळे चोरटी वाळूची वाहतूक करणाऱयांचे दाबेदणाणले आहेत.  

   या बाबत म्हसवड पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार माणगंगा नदीपात्रातून राजरोसपणे चोरटय़ा वाळूची वाहतूक मोठय़ा प्रमाणात होत असल्याची माहिती सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्याप्रमाणे सातारा येथून सपोनि. व्हि. एस. जाधव यांच्या पथकातील विक्रम पिसाळ, मयूर देशमुख, शरद बेबले, निलेश काटकर, कांतीलाल नवघणे, प्रविण फडतरे, मोहन नाचण, विजय सावंत व मारुती आडागळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. राऊतवाडी परिसरातील नदीमध्ये एक डंपर, एक ट्रक व एक ट्रँक्टर अशी तीन वाहने जप्त केली आहेत. 4 लाख रुपये किमतीचा डंपर व त्यातील चार ब्रास वाळू 12 हजार रुपयेची, तर 3 लाख रुपये किमतीचा ट्रक व त्यातील वाळू तीन ब्रासची किमंत 9 हजार आणि 1 लाख 50 हजार रुपये किमतीचा आयशर, कंपणीचा ट्रँक्टर त्यामधील वाळू एक ब्रास वाळू 3 हजार रुपये किंमत असे एकूण 8 लाख 74 हजार आठ ब्रास वाळू अशी कारवाई करण्यात आली आहे.

 आकाश अर्जुन गिरी (रा म्हसवड), शांताराम नाना शिंगाडे (रा. शिरताव) नितीन विष्णू कलढोणे (रा. म्हसवड), बाळासाहेब बयाजी विरकर, विक्रम लक्ष्मण राऊत, रवी टाकणे व किसन नागू बनगर (विरकरवाडी) यांच्यावर चोरटय़ा वाळूची वाहतूक करत असल्याबाबत पोलीस हवलदार सुरज काकडे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वरील आरोपींवर भाग 5 गु. र. नं. 204/18 भादविसं 379,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनि मालोजीराव देशमुख करत आहेत.