|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » चिकोडी सीबीसी कालवा पाणी योजनेला मंजुरी द्या

चिकोडी सीबीसी कालवा पाणी योजनेला मंजुरी द्या 

वार्ताहर/ चिकोडी

चिकोडी तालुक्यातील हिरेकुडी नेज, नागराळ आदी भागातील शेतकऱयांच्या शेतीला पाण्याची गरज असते. पाण्याविना शेती करणे कठिण बनले आहे. त्यावर उपाय म्हणून कृष्णा नदीतून पाणी उपसा करुन सीबीसी कालव्याला 54 किलो मिटरपासून ते 88 किलो मिटरपर्यंत पाणी सोडण्यासाठी पाणी उपसा योजनेला मंजुरी द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून करण्यात आली होती. त्याची दखल घेत खासदार प्रकाश हुक्केरी व आमदार हुक्केरी यांनी बेळगाव येथील अधिवेशनात सदर समस्येबाबत मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी सदर योजनेला मंजुरी द्यावी, अशा मागणीचे निवेदन दिले.

निवेदनात, सीबीसी कालव्याच्या 54 किलोमिटर पासून 88 किलोमिटर पर्यंतच्या भागात येणाऱया गावातील नागरिकांच्या 12634 हेक्टर जमिनीला पाणी पुरवठा करण्यासाठी 2018-19 च्या बजेटमध्ये निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱयातून होत आहे. तुम्ही सादर केलेल्या बजेटमध्ये पाणी उपसा योजनेला लघूपाटबंधारे खात्याकडून 100 कोटींचा निधी मंजूर केला आहे. सदर खात्याने योजनेचा अहवाल तयार करुन अतिरिक्त 39.55 कोटीसह 139 कोटी 55 लाखांचा निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. पण पाणी उपशाला परवानगी दिलेली नाही. ती आपण मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदन स्विकारुन मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी लवकरच संबंधित खात्यांच्या अधिकाऱयांची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. यावेळी कर्नाटक द्राक्षरस मंडळाचे माजी अध्यक्ष रविंद्र मिर्जे, सुरेश चौगुला, विजय पाटील, माणिक पाटील, किरण पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.