|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » मध्यप्रदेशाला 25 रोजी मिळणार मंत्रिमंडळ

मध्यप्रदेशाला 25 रोजी मिळणार मंत्रिमंडळ 

वरिष्ठ नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता : राज्य काँग्रेसमधील गटबाजी रोखण्याचे आव्हान

वृत्तसंस्था/ भोपाळ 

मध्यप्रदेशच्या कमलनाथ यांच्या सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी 25 डिसेंबर रोजी राजभवन येथे होणार आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या दिल्ली दौऱयात नावांच्या यादीला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर या तारखेची घोषणा करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री कमलनाथ यासंबंधी दोन दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत. त्यांनी राहुल यांच्याशी यादीबद्दल चर्चा केली आहे. दिग्विजय सिंग तसेच ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या गटाला झुकते माप मिळणार असल्याचे मानले जातेय.

मंत्रिमंडळासाठी पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांना प्राधान्य मिळणार नसल्याचे संकेत कमलनाथ यांनी दिले आहेत. मंत्रिमंडळाबद्दल राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी याकरता सहमती प्रदान केल्याचे कमलनाथ यांनी सांगितले आहे.

तर मंत्रिमंडळात स्थान मिळावे याकरता आमदारांमध्ये चढाओढ सुरूच आहे. भोपाळपासून दिल्लीपर्यंत मंत्रिपदासाठी आमदार विविध नेत्यांच्या घरांचे उंबरठे झिजवत आहेत. परंतु आता यादी राजभवनला सोपविण्यात आल्याचे समजते. आता कोण मंत्री होणार याची घोषणा 25 रोजीच होणार आहे.

Related posts: