|Sunday, January 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » अपयशाचे श्रेयही नेतृत्त्वाने घ्यावे !

अपयशाचे श्रेयही नेतृत्त्वाने घ्यावे ! 

मोदी-शहांना ‘चिमटा’ : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पुण्यात सूचक वक्तव्य

पुणे / प्रतिनिधी

राजकारणात जेव्हा अपयश येते, तेव्हा कमिटी बसते. विजय मिळाला की कोणी विचारत नाही. कारण विजयाचे बाप अनेक असतात. अपयश मात्र अनाथ असते. त्यामुळे अपयशाचेही श्रेय घेण्याची वृत्ती नेतृत्त्वात असावी, असे सूचक वक्तव्य करीत केंद्रीय रस्ते व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांना टोला लगावला.

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनतर्फे आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱया नागरी बँकांच्या गौरव गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच विद्याधर अनास्कर यांची महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांना ‘बँकिंगरत्न पुरस्कार’ आणि असोसिएशनच्या ज्ये÷ संचालिका शीला काळे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गडकरी बोलत होते. राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख, खासदार अनिल शिरोळे, असोसिएशनचे अध्यक्ष अ?ड सुभाष मोहिते, उपाध्यक्ष अ?ड. साहेबराव टकले, सचिव संगिता कांकरीया, मुख्य कार्यकारी अधिकारी डा?. विलास शौचे आदी यावेळी उपस्थित होते.

नुकत्याच पाच राज्यांच्या झालेल्या निवडणुकींमध्ये काँग्रेसने तीन राज्यांत यश मिळविले असून, भाजप मागे पडल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना गडकरी यांनी हा टोला लगावला आहे. गडकरी म्हणाले, यशाचे श्रेय घेण्यासाठी सर्व असतात. मात्र, अपयश आले की दुसऱयाकडे बोटे दाखवितात. निवडणुकीमध्ये हरल्यानंतर, मी पैसे मागितले होते, दिले नाही. सभा मागितली होती, सभा दिली नाही, असे सांगतात. मात्र, तू आणि तुझा पक्ष लोकांची विश्वासार्हता संपादन करण्यात कमी पडला, हे ते विसरतात. त्यामुळे अपयशाचेही श्रेय घेण्याची वृत्ती नेतृत्त्वात असायला हवी, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, एखादी बँक अडचणीत आली तर तिने फक्त सरकारी मदतीच्या अपेक्षेवर राहू नये. अडचणीत आलेल्या बँकेचे दुसऱया बँकेत विलिनीकरण झाले तर फायदा होईल. त्यासाठी विलिनिकरणाची प्रक्रिया सोपी, सुरळीत आणि वेगाने व्हायला हवी, एखादी बँक अडचणीत आल्यास फक्त संचालकांना जबाबदार धरणे चुकीचे आहे. एखादी संस्था अडचणीत आली तर त्या संस्थेच्या अडचणी दूर करण्यापेक्षा संस्थेच्या अडचणीत भर कशी पडेल, संस्था बंद कशी पडेल, यावर जास्त भर दिला जातो. या पुढे सर्व बँकांना कोणाला कर्ज द्यावे, कोणत्या व्यवसायासाठी द्यावे, हे समजून घ्यावे लागणार आहे.

सहकार चळवळीविषयी बोलताना गडकरी म्हणाले, सहकार चळवळ ही एकमेकांच्या सहकार्याने उभी राहिलेली चळवळ आहे. व्यक्तिगत संबंध, सर्वसमावेशकता, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती हे चळवळीचे मूळ आहे. नागरी बँकांमध्ये एकत्रित काम करण्याची पद्धती गरजेची आहे. तंत्रज्ञान, व्यवस्थापन, स्त्राsत या गोष्टी जरी नागरी बँकांकडे असतील, तरीही विश्वसनीयता असणे जास्त गरजेचे आहे. त्यामुळे विश्वसनीयता हे 21 व्या शतकात बँकांसाठीचे मोठे भांडवल आहे.

सहकार चळवळीचे मार्केटिंग करण्याची गरज : गडकरी

दिल्लीत कोणाला सहकार चळवळ माहीत नाही. महाराष्ट्र, गुजरात राज्य सोडले तर एवढय़ा चांगल्या प्रकारे सहकार चळवळ कोठेही सुरु नाही. अनेक राज्यांमध्ये सहकारी संस्था बुडाल्या आहेत. याचीच माहिती दिल्लीतील लोकांना असल्याने सहकार चळवळीची विश्वासार्हता खराब असल्याचे चित्र दिल्लीत आहे. त्यामुळे सहकार चळवळीचे मार्केटिंग करण्याची गरज आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

साखर कारखान्यांना कर्ज देवू नका : गडकरी

साखर कारखान्यांना कर्ज देवू नका, अशी सूचना नितीन गडकरी यांनी कार्यक्रमात केली. सध्या साखर सरप्लस आहे. जे कारखाने इथेना?ल निर्मिती करतील त्यांनी जाणीवपूर्वक वित्त पुरवठा करा. कारण, सध्या इथेना?लला चांगले दिवस आहे, असे गडकरी यांनी सांगितले.

 

पुणे : पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनतर्फे महाराष्ट्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱया नागरी बँकांच्या गौरव सोहळय़ाचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आले. यावेळी शीलाताई काळे यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित अन्य मान्यवर.

Related posts: