|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मुख्यमंत्री फडणवीस, नितीन गडकरी आज जिल्हय़ात

मुख्यमंत्री फडणवीस, नितीन गडकरी आज जिल्हय़ात 

प्रतिनिधी/ सांगली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी रविवारी 23 रोजी जिल्हय़ाच्या दौऱयावर येत आहेत. ते कवठेमहाकांळ तालुक्यातील नागज आणि शिराळा येथील कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमिवर होत असलेल्या या दौऱयात मुख्यमंत्री फडणवीस, गडकरी यांच्याकडून जिल्हय़ाच्या विकासासाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. खासदार संजयकाका पाटील यांनी नागज येथे सकाळी 11 वाजता आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याला राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार विलासराव जगताप, आम. सुधीर गाडगीळ, आम. सुरेश खाडे, आम. अनिल बाबर, माजी आम. पृथ्वीराज देशमुख, दिनकर पाटील, जि.प. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, महापौर सौ. संगीता खोत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, नागजच्या मेळाव्यानंतर आमदार शिवाजीराव नाईक यांनी शिराळा येथे दुपारी एकच्या सुमारास आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यालाही मुख्यमंत्री उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. दोन्ही मेळाव्यांची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

 

Related posts: