|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘तरुण भारत’ वाचकांशी नातं जपणारं वृत्तपत्र

‘तरुण भारत’ वाचकांशी नातं जपणारं वृत्तपत्र 

मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला 26 वा वर्धापनदिन सोहळा अपूर्व उत्साहातः

प्रतिनिधी/ कोल्हापूर

अन्यायाविरुद्ध झुंज आणि लोकशिक्षण हे ब्रीद घेऊन कोल्हापूरमध्ये गेली 26 वर्षे ‘तरुण भारत’ने आपली वाटचाल निर्भिडपणे सुरु ठेवली आहे. जनसामान्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. सत्याचा स्वीकार आणि अन्यायाविरुद्ध  लढण्यासाठी पाठबळ दिले आहे. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली, न्याय मिळवून दिला. कणखर बाणा असलेल्या ‘तरुण भारत’सोबत आमचे ऋणानुबंध, आपुलकीचे नाते आजही घट्ट आहे. आपुलकीचे नाते जपणारे एकमेव वृत्तपत्र अशा शब्दात वाचक, हितचिंतकांनी ‘तरुण भारत’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. कडाक्याची थंडी आणि अंगाला बोचणाऱया गार वाऱयातही शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, व्यापार, क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती.

दसरा चौकातील ‘तरुण भारत’च्या शहर कार्यालयामध्ये शनिवारी सकाळी 11 वाजता विधीवत पूजा होऊन वर्धापनदिन कार्यक्रमाला सुरूवात झाली. वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी दसरा चौकातील ‘तरुण भारत’ भवनजवळील मुस्लीम बोर्डिंगच्या पटांगणावर वाचक, हितचिंतकांचा स्नेहमेळावा आयोजित केला होता. पटांगणावर उभारण्यात आलेल्या भव्य शामियान्यात आल्हाददायक, स्नेहभरल्या वातावरणात ‘तरुण भारत’ परिवाराच्यावतीने समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक प्रभू, संपादक जयवंत मंत्री, जाहिरात विभागप्रमुख उदय खाडीलकर, निवासी संपादक मनोज साळुंखे यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेला हा स्नेहमेळावा उत्तरोत्तर रंगतदार होत गेला.

सकाळपासूनच शहरातील विविध मान्यवरांकडून प्रत्यक्ष भेटून तसेच दूरध्वनी, एसएमएस व पत्रांद्वारे शुभेच्छांचा वर्षाव सुरु होता. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, महापौर सरिता मोरे, आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे, संजयबाबा घाटगे, नानासो माने, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी संजय राजमाने, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवशी, माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवी शिवदास, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे, कार्यकारी अभियंता तुषार बुरुड, पन्हाळा तहसीलदार गणेश शिंदे, नायब तहसीलदार अनंत गुरव, महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विकास पुरी, कृषी अधिकारी अविनाश मेश्राम, शहर पोलीस अधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, अनिल गुजर, गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, संचालक अरुणकुमार डोंगळे, धैर्यशील देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई, माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे, रासाई हॉस्पिटलचे डॉ. आनंद गुरव, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, अधिष्ठाता डॉ. भारती पाटील, उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे, जनसंपर्क अधिकारी अलोक जत्राटकर, डॉ. पी. एस. पांडव, विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागीय सचिव सुरेश आवारी, सहसचिव टी. एल. मोळे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील आदींनी शुभेच्छा दिल्या.