|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत रत्नागिरीच्या ‘कॅलिडोस्कोप’ची बाजी

राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत रत्नागिरीच्या ‘कॅलिडोस्कोप’ची बाजी 

वार्ताहर/ राजापूर

तालुक्यातील तालुक्यातील ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ, ओणी आयोजित जयवंत दळवी स्मृती राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धेत रत्नागिरीच्या चौकट क्रिएशनच्या  ‘कॅलिडोस्कोप’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला. तर मुंबईच्या एम.डी.कॉलेजच्या ‘तुरटी’ला द्वितीय व रत्नागिरी मिरजोळे येथील एसपी हेगशेटय़े कॉलेजच्या ‘आंदण’ या एकांकिकेला तृतीय क्रमांक मिळाला. विजेत्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत रोख रूपयांसह मानाचा चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.         

राजापूर तालुक्यातील ओणी येथील ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या वतीने जयवंत दळवी स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे सलग सहाव्या वर्षी आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या 9 एकांकिकांचे सादरीकरण श्रीमती मंगला मारूतीराव सावंत या मंचावर दि.27 ते 29 डिसेंबर 2018 या कालावधीत करण्यात आले. यामध्ये रत्नागिरीच्या चौकट क्रिएशनच्या ‘कॅलिडोस्कोप’ एकांकिकेने बाजी मारली. विजेत्यांना रोख 21 हजार व चषक, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तर द्वितीय क्रमांक एम.डी.कॉलेज 15 हजार व तृतीय क्रमांक पटकाविणाऱया एसपी हेगशेटय़े कॉलेजला 10 हजार व प्रत्येकी चषक, प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

उत्कृष्ट अभिनयामध्ये कॅलिडोस्कोप मधील नंदकिशोर जुवेकर, निकिता सावंत, तुरटीमधील कोमल वंजारे (शांताबाई), आंदणमधील सौ.गिता जोशी (कमल), 29 सप्टेंबर 2006 मधील प्रियांका (आई) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ व पाचवा क्रमांक पटकाविला. सर्वोत्कृष्ट लेखनामध्ये प्रथम रोहीत कोलते (तुरटी), तर द्वितीय क्रमांक ऋषिकेश नुराई (कॅलिडोस्कोप) यांनी पटकाविला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन रोहित मोहिते व रोहित कोतेकर (तुरटी) प्रथम, तर नंदकिशोर जुवेकर ( कॅलिडोस्कोप) यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. तसेच सर्वोत्कृष्ट नेपथ्य उज्वल कानसकर (तुरटी), सर्वोत्कृष्ट संगीत रोहित सनगरे (आंदण), तर चंद्रशेखर मुळे (अमन) सर्वोत्कृष्ट प्रकाश योजनेचा मानकरी ठरले.

स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला संस्थाध्यक्ष वासुदेव तुळसणकर यांच्यासह  परीक्षक उपेंद्र दाते, राजन पाटील, लेखक दिग्दर्शक अनिल दांडेकर, राजन पाटील, दीपक पडते, प्रदीप संसारे, अरविंद गोसावी, महादेव धुरे, सुबोध मुळगावकर, अशोक ब्रीद, कृष्णा घाडी, संजय सावंत, गणपत भारती, गणपत जानस्कर, नामदेव तुळसणकर, सुर्यकांत तुळसणकर, श्रीराम तुळसणकर, संतोष वडवलकर, हेमंत राणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विनोद मिरगुले यांनी केले.

 

Related posts: