|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » क्रिडा » यूपी योद्धाचा मुम्बावर विजय

यूपी योद्धाचा मुम्बावर विजय 

वृत्तसंस्था/ कोची

यूपी योद्धाने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करीत पीकेएलच्या पहिल्या एलिमिनेटर सामन्यात यू मुम्बाचा 34-29 असा पराभव केला.

नितेश कुमारने सर्वोत्तम बचावाचे प्रदर्शन करताना यूपीसाठी सर्वाधिक 8 गुणांची कमाई केली. यूपी योद्धाच्या बचावफळीने पकडीचे 18 गुण मिळविताना यू मुम्बाचा स्टार रायडर सिद्धार्थ देसाईला वरचढ होऊ देले नाही. मुम्बासाठी देसाईने चढाईचे फक्त 7 गुण मिळविले तर यूपीसाठी श्रीकांत जाधव व प्रशांत कुमार राय यांनी चढाईचे 9 गुण मिळविले.

Related posts: