|Monday, January 20, 2020
You are here: Home » Top News » पाण्यात बुडुन तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

पाण्यात बुडुन तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / बेंगळूर :

येथील नेत्रावती नदीत बुडुन तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्य़ाच्या उत्तुर तालुक्यातील उप्पीनंगडी येथे ही घटना घडली आहे. महोम्मद सय्यद, साहिर व फिर्यान अशी मृत झालेल्या मुलांची नावे असुन हे तिघेही उप्पीनंगडी येथील पदवी पुर्व विभागाच्या द्वितीय वर्षाचे विद्यार्थी होते.

फिर्यान याचा वाढदिवस असल्याकारणाणे त्यांच्यावर्गातील एकुण 18 विद्यार्थी केक कापण्याच्या निमित्ताने नेत्रावती नदी किणारी गेले होते. वाढदिवस साजरा करून 15 विद्यार्थी परत आले होते. त्यापैकी तिघेजण तेथेच राहिले.

यादरम्यान फिर्यान आपल्या तोंडाला केक लागल्यामुळे तोंड धुण्याच्या निमित्ताने नदीत उतरला पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीन बुडला गेला, त्याला वाचविण्याकरीता इतर दोघेही पाण्यात उतरले व ते ही पाण्यात बुडाले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related posts: