|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » बंदूकीचा धाक दाखवून युवतीचा विनयभंग

बंदूकीचा धाक दाखवून युवतीचा विनयभंग 

प्रतिनिधी/ सातारा

शाहूपुरी रस्त्यावर एका तरुणीला दुचाकी आडवी मारून बंदूकीचा धाक दाखवत तिच्या अंगाशी झोंबाझोंबी केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अरबाज नईम शेख (रा. गुरुवार पेठ, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   याबाबत अधिक माहिती अशी की, 23 वर्षीय पीडित तरुणीशी अरबाज नईम शेख (रा. गुरुवार पेठ) याने दोन वषापूर्वी फेसबुकद्वारे तिच्याशी मैत्री केली.  तेव्हापासून तो वारंवार फेसबुकवरुन तिच्याशी संपर्कात होता. ज्यावेळेस ती युवती त्याला प्रत्यक्ष भेटली तेव्हापासून तो तिचा दुचाकीवर वारंवार पाठलाग करून लग्नग्न करण्याची जबरदस्ती करत होता. सोमवारी सायंकाळी तरुणी सातारा शहरात येत असताना पाठीमागून येऊन गाडी आडवी मारुन तिला धमकावू लागला व तिच्या गाडीची चावी हिसकावून घेत रिव्हॉल्व्हर व चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच तिच्या अंगाशी लगट केली. याप्रकरणी तरुणीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बी. पी. किर्दत करीत आहेत.  

व्हॉट्सऍपवरून विनयभंग करणाऱया अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

शहरालगत राहणाऱया एका विवाहीत महिलेला एका अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सऍपवरून अश्लिल मॅसेज केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर  विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   याबाबत माहिती अशी की, 31 वर्षीय विवाहीत महिला तिच्या ब्यूटी पार्लरमध्ये काम करत असताना एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्सऍपवर मॅसेज आला. यामध्ये चार अश्लिल छायाचित्र होते. तसेच त्याखालील विवाहितेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असा मजकूर लिहिला. याप्रकरणी पीडित महिलेने सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related posts: