|Friday, November 15, 2019
You are here: Home » Top News » ….मग होऊ दे जेपीसी ; राफेल करारावर शिवसेनेलाही संशय

….मग होऊ दे जेपीसी ; राफेल करारावर शिवसेनेलाही संशय 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राफेल करारावरुन आज लोकसभा सभागृहात मोठा गदारोळ पहायला मिळाला, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही आता राफेल करारासंदर्भात संशय व्यक्त केला आहे. अर्थमंत्री अरुण जेटलींनी राहुल गांधींच्या प्रश्नाला सविस्तरपणे उत्तरे दिली होती. मात्र, जेटलींच्या उत्तराने आपले समाधन झाले नसल्याचे खासदार सावंत यांनी म्हटले. तसेच मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवरही संशय व्यक्त केला आहे.

 

संसद सभागृहात यूपीएच्या काळात झालेला 126 विमानांचा करार मोदी सरकारने 36 विमानांवर का आणला? या विमानांची किंमत अचानक एवढी कशी वाढली? आणि 45 हजार कोटींचे कर्ज असणाऱया अनिल अंबानींना हे कंत्राट का देण्यात आले?, असे रोखठोक सवाल करत राहुल गांधींनी मोदींना लक्ष्य केले. राहुल यांच्या प्रश्नावर अर्थमंत्री जेटलींनी उत्तरे दिली. तसेच राफेल करारात कुठलाही घोटाळा नसून शस्त्रधरी विमानांच्या खरेदी केल्यामुळेच याची किंमत वाढल्याचे जेटली म्हणाले. मात्र, जेटलींच्या उत्तराने आपले समाधन झाले नसून सरकार जर स्वच्छ अन् पारदर्शी असेल तर आपण जेपीसीला का घाबरतो ? असा प्रश्न शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केला. तसेच, ज्याची कुठलिही कंपनी नव्हती असा कसला ऑफसेट कॉन्ट्रक्टर होता ? केवळ कागदोपत्रीच कंपनी होती का ?. याउलट एचएएलकडे सर्वच असतानाही एचएएलला काँट्रक्ट का दिले नाही, असाही प्रश्न सावंत यांनी विचारला आहे. सरकार पारदर्शक आहे ना, मग होऊ द्या जेपीसी असे म्हणत शिवसेनेनंही राफेल करारावरुन सरकारला आव्हान दिले आहे.

 

 

Related posts: