|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » झाडाची पारंबी डोक्यावर पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

झाडाची पारंबी डोक्यावर पडून विद्यार्थ्याचा मृत्यू 

वार्ताहर/ कुडाळ

फलटण तालुक्यातुल अलगुडेवाडी येथील कमला निंमकर बालभवन या शाळेची सहल जावळी तालुज्यातील  वडाचे म्हसवे येथे आली होती.  यावेळी प्रज्वल नितीन गायकवाड (वय 11) पाचवीमध्ये शिकत असलेला विद्यार्थी वडाच्या झाडाच्या पारंब्याशी खेळत होता. यावेळी त्याच्या डोक्यावर वडाच्या झाडाची पारंबी पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे मस्के तालुका जावल येथे एकच खळबळ माजली आहे.  

जावली तालुक्यातील प्रसिद्ध  जगप्रसिद्ध असलेल्या महाकाय वडाचे वटवृक्ष  वडाचे झाड पहाण्यासाठी  म्हसवे या गावांमध्ये मुलांना दाखवण्यासाठी शाळेची सहल आली होती.  म्हसवे येथील मंदिराचे दर्शन घेतल्या नंतर सर्व मुले वडाचे महाकाय वटवृक्ष पहाण्यासाठी पुढं गेली त्यातील प्रजवल हा पुढं झाडाच्या लोंबकळत्या मनमोहक  पारंब्या पहाताच झुला झुळण्यासाठी धावत पुढं गेला पारंब्याना झुला घेत असतानाच 50 फूट वरून भली मोठी परंबी प्रजवल च्या जोरात डोक्यावर आदळली इतक्यात प्रजवल झाडाची फांदी डोक्यावर कोसळताच जाग्यावर बेशुद्ध पडला काही कळण्याच्या आधीच ही दुर्देवी घटना समोर उभी राहिली लगेच सहली मध्ये जे शिक्षक मुलांना घेऊन आले त्यांना तात्काळ प्रजवल ला लगदच असणाया कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले मात्र उपचारा पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता

या घटनेची माहिती मिळताच मेघा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने गटविकास अधिकारी बुद्धे आरोग्य अधिकारी मोहिते घटनास्थळी दाखल झाले सोबत सहलीला आलेले सर्व मुलं त्याच बस मध्ये बसऊन पुन्हा फलटण आलगुडे वाडी गावात रवाना केली

प्रजलव हा एकुलता एक मुलगा त्याच्या माता पित्यास होता त्याचे वडील त्याच शाळेत सुतार काम म्हणून नोकरीस आहेत  अत्यन्त गरीब परिस्थिती असणारे त्याच्या माता पित्यावर दुःखा चा डोंगर कोसळला आहे शविच्छेद साठी त्याचा मृतदेह मेढा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून त्यांच्या कुटूंबीय कडे मृतदेह देण्यात आला 

आई वडिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता प्रजवल च्या अपघाती मृत्यू ने सहलीला आलेल्या प्रत्येक मुलाच्या डोळ्यात डबडबले अश्रू होते तर त्याचे शिक्षिका हंबरडा फोडून रुग्णालयात रडत असताना उपस्थितीतचे मन हेलावून गेले

अपघाती मृत्यू ची नोंद कुडाळ पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास स पो नि जीवन माने करत आहे

 

Related posts: