|Friday, October 18, 2019
You are here: Home » Top News » कार्यालयासाठी वीज चोरणाऱ्या राष्ट्रवादीच्या युवक अध्यक्षाला अटक

कार्यालयासाठी वीज चोरणाऱ्या राष्ट्रवादीच्या युवक अध्यक्षाला अटक 

ऑनलाईन टीम / भिवंडी :

कार्यालयासाठी वीज चोरी केल्याच्या आरोपाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधानसभा युवक अध्यक्ष हारून खानला अटक करण्यात आली आहे. हारून याने न्यू कणेरी येथील कार्यालयासाठी वीजेची चोरी केली होती.

हारून हा त्याच्या कार्यालयात मीटर नसलेल्या वीजेची जोडणी वापरतो. त्याने आतापर्यंत 90 हजार रूपयांची वीजेची चोरी केली आहे. दंड न भरल्यामुळे त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. टोरंट पॉवर कंपनीने हारून याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. कंपनीच्या तक्रारीनुसार भिवंडी शहर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तक्रारीनुसार आज त्याला अटक करण्यात आली.