|Monday, December 16, 2019
You are here: Home » Top News » एकाच कुटुंबातील चौघांची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

एकाच कुटुंबातील चौघांची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या 

ऑनलाईन टीम / बुलडाणा :

मेहकर तालुक्यातील बाभुळखेड येथील एकाच कुटूंबातील चौघांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतकांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. मनीषा अंकुष गायकवाड (28), समर्थ अंकुश गायकवाड, युवराज अंकुश गायकवाड, शिवाजीराव बकाल (58) यांचे मृतदेह मेहकर-चिखली रोडवरील भाऊराव वानखेडे (रा. मेहकर) यांच्या शेतात आढळुन आले. घरघुती वादामधून ही आत्महत्या झाल्याची माहिती आहे. मेहकर पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत.

Related posts: