|Friday, December 13, 2019
You are here: Home » Top News » मराठी साहित्य संमेलेन अध्यक्षा अरूणा ढेरेंना डॉ.मुणगेकरांचे खुले पत्र

मराठी साहित्य संमेलेन अध्यक्षा अरूणा ढेरेंना डॉ.मुणगेकरांचे खुले पत्र 

ऑनलाईन टीम / मुंबई :

यवतमाळमध्ये आयोजित 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाच्या अध्यक्षा आणि ज्येष्ठ साहित्यिका डॉ.अरूणा ढेरे यांना अर्थतज्ञ आणि शिक्षणतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी खुले पत्र लिहिले आहे. ज्ये÷ लेखिका नयनतारा सहाल यांचे निमंत्रण मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी रद्द केल्यानंतर त्याचे विविध स्तरातून पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून आपली भूमिका मांडण्याचे आवाहन डॉ. मुणगेकरांनी अरूणा ढेरे यांना केले आहे.

डॉ.मुणगेकरांचे खुले पत्र

आदरणीय, श्रीमती अरुणाताई ढेरे,

सादर प्रणाम.

प्रत्येक वषी कोणत्या त्या कोणत्या भानगडीत अडकलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी या वषी आपली बिनविरोध निवड झाली. ही मराठी जणांना सुखावणारी गोष्ट आहे.

परंतु यावेळी, साहित्य अकादमी सन्मानपात्र ख्यातनाम साहित्यका श्रीमती नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण संयोजकांनी अचानक रद्द केले आणि भानगडींची परंपरा सुरू ठेवली.

सहगल याचे निमंत्रण रद्द केल्यानंतर मराठी साहित्य-विश्वात निर्माण झालेल्या वादळाची आपल्याला कल्पना आहे. सहगल इंग्रजी भाषिक साहित्यकि आहेत, म्हणून त्या आल्यास संमेलनात गोंधळ घालू, हे कारण सांगून काही झुंडशाही प्रवृत्तींनी दिलेल्या धमकीमुळे त्यांचे निमंत्रण रद्द करण्यात आले. खरे कारण, सेहगल एक संवेदनशील साहित्यका असल्यामुळे त्या देशातील प्रचलित वाढत्या असहिष्णुतेवर भाष्य करणार होत्या, हे आहे.

आता संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून याबाबत आपली भूमिका महत्वाची आहे.

आपल्या साहित्य-सेवेबद्दल आदर आणि कृतज्ञता म्हणून, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा, आणि तो ही बिनविरोध, सन्मान आपल्याला मिळालाच आहे. आता संमेलनाच्या मंचावरुन अध्यक्षीय भाषण करणे, हा एक औपचारिकपणा आहे. न्या. महादेव गोविंद रानडे यांच्याकडून मराठी साहित्याविषयी जाणिवा घेतलेल्या माझ्या सारख्याला या औपचारिकपणाचे महत्त्व ठावूक आहे. परंतु कोणत्याही कारणामुळे, प्रचलित परिस्थितीत आपण संमेलनास उपस्थित राहून अध्यक्षीय भाष्य केल्यास कणाहीन संयोजकांप्रमाणेच आपणही असहिष्णुता आणि झुंडशाहीसमोर शरण गेल्यासारखे होईल. भारतातील उदारमतवादाचे जनक असलेल्या युगपुरुष न्या. रानडे यांच्या विचारविश्वाशी ती प्रतारणा ठरेल.

आपल्या सद्सदविवेकबुद्धीवर माझा विश्वास आहे.

 

आपला,

डॉ. भालचंद्र मुणगेकर

 

Related posts: