|Thursday, August 22, 2019
You are here: Home » Top News » 90 दिवसांमध्ये मोदींच्या ऍपवरून विकल्या गेल्या 5 कोटींच्या वस्तू

90 दिवसांमध्ये मोदींच्या ऍपवरून विकल्या गेल्या 5 कोटींच्या वस्तू 

ऑनलाईन टीम / मुंबई :

महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमी नमो अगेन म्हणजेच ‘पुन्हा एकदा नमो’ या मोहिमेअंतर्गत वेगवगेळय़ा वस्तू या ऍपवरून विकल्या जात आहेत. यामध्ये अगदी टी-शर्टपासून पेनपर्यंत अनेक नमो मर्चंडाइजचा समावेश आहे.

एकीकडे तीन राज्यांमधील निवडणुकांमध्ये सपाटून मार खावा लागलेला असताना दुसरीकडे ‘पुन्हा एकदा नमो’ या मोहिमेला नेटकऱयांचा मिळणारा प्रतिसाद हा भाजपासाठी नक्कीच सकारात्मक आहे. 90 दिवसांमध्ये या ऍपवरून 15 लाख 75 हजार वस्तू विकल्या गेल्या आहेत. जसजशी निवडणुक जवळ येईल तशी या वस्तूंच्या विक्रीमध्ये वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

नमो ऍपवरून सर्वाधिक खरेदी ही भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांमधून आणि देशभरातील भाजपा कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. मागील महिन्यापासून पेटीएम आणि ऍमेझाँनसारख्या माध्यमातूनही ‘नमो’ ब्रॅण्डच्या वस्तू विक्रिसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी सुरु केलेल्या डिजीटल इंडियाचा फायदा त्यांच्याच वस्तूविक्रीला अधिक झाल्याचे दिसून येत आहे.