|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » एक इंचही जमीन शासनाला बळकावू देणार नाही

एक इंचही जमीन शासनाला बळकावू देणार नाही 

वार्ताहर/ सांबरा

सध्या शासनाने रिंगरोडचे कारण पुढे करून शेतकऱयांच्या सुपीक जमिनी घशात घालण्याचा प्रयत्न चालविला आहे. तरी पूर्वभागातील एक इंच जमीनही कोणत्याही परिस्थितीत देण्यात येणार नाही. प्रसंगी तीव्र आंदोलन छेडण्याचा एकमुखी निर्धार शुक्रवारी सकाळी मुतगा येथे झालेल्या बैठकीत करण्यात आला.

येथील श्री भावकेश्वरी मंदिरात झालेल्या बैठकीस मुतगा, शिंदोळी, मुचंडी, सुळगा येथील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. प्रारंभी ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर यांनी शासनाने कशा पद्धतीने शेतकऱयांच्या सुपीक जमिनी हडपण्याचा डाव आखला आहे, याची सविस्तर माहिती दिली.

 शाम पाटील यांनीही लढय़ाच्या संदर्भात मार्गदर्शन केले. बैठकीत पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी लवकरच संबंधित सर्व गावातील शेतकऱयांची बैठक घेण्याचे ठरविण्यात आले.

बैठकीस किरण पाटील (सुळगा), मारुती पाटील, किसन पाटील, सयाजी पाटील, सुनील पाटील, जयश्री देसाई, रेखा मल्लवगोळसह शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.