|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » Top News » बेरोजगारांना अटक करता,पण पुरावे कुठे ? ; दाभोलकर हत्याप्रकरणी हायकोर्टाने फटकारले

बेरोजगारांना अटक करता,पण पुरावे कुठे ? ; दाभोलकर हत्याप्रकरणी हायकोर्टाने फटकारले 

ऑनलाईन टीम / मुंबई :

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात मुंबई हायकोर्टाने सीबीआयला फटकारले आहे. बेरोजगारांना अटक करता, पण पुरावे कुठे आहेत, असा सवाल विचारतानाच दुसऱया राज्यांच्या तपासावर अवलंबून राहणे लाजिरवाणे आहे, अशा शब्दात हायकोर्टाने सीबीआयला खडेबोल सुनावले आहेत.

 

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे. या याचिकेवर गुरुवारी हायकोर्टात सुनावणी झाली. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार हायकोर्टाने सीबीआयला खडे बोल सुनावले आहेत. हत्या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींविरोधात अजूनही आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही, याकडे लक्ष वेधत हायकोर्टाने सांगितले की, तुम्हाला या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येत नाही का?, बेरोजगारांना अटक करता पण पुरावे कुठे आहेत?, असे हायकोर्टाने विचारले. गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा तपास करणाऱया कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) काही आरोपींना अटक केली आणि यानंतर दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपीही जाळय़ात अडकले होते.

 

Related posts: