|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Automobiles » 5 हजारांत बुकिंग सुरू, होंडाची नवी ‘सीबी 300 आर’

5 हजारांत बुकिंग सुरू, होंडाची नवी ‘सीबी 300 आर’ 

ऑनलाईन टीम / मुंबई :

दुचाकी बनवणारी दिग्गज कंपनी ‘होंडा मोटरसायकल अँड स्कुटर इंडिया’ नवी मोटरसायकल ‘होंडा सीबी 300 आर’ भारतीय बाजारात लाँच करण्याच्या तयारीत आहे. याशिवाय या बाइकसाठी नोंदणी देखील सुरू करण्यात आली आहे. केवळ 5 हजार रुपयांमध्ये या बाइकसाठी नोंदणी करता येईल.

या बाइकमध्ये 6 स्पीड ट्रांसमिशनसह 286सीसीचं DOHC 4 वॉल्व लिक्विड कूल्ड सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आलं आहे. नियो स्पोर्ट्स कॅफे बाइकच्या प्रेरणेतून या नव्या बाइकला डिझाइन करण्यात आलं आहे, तसंच अल्ट्रा मॉडर्न लुक देखील देण्याचा प्रयत्न कंपनीने केलाय. म्हणजेच रेट्रो आणि मॉडर्न असं समीकरण या बाइकमध्ये पाहायला मिळेल. यात एबीएस फीचरसह 296mm चा डिस्क ब्रेक आहे. Matte Axis Gray Metallic आणि Candy Chromosphere Red या दोन रंगांमध्ये ही बाइक उपलब्ध असेल. या बाइकला लाँच करण्याची तयारी कंपनीने केली आहे, पण नेमकी कधी ही बाइक लाँच केली जाणार याबाबत अद्याप कंपनीने माहिती दिली नाही. KTM 390 Duke, BMW G 310 R आणि Royal Enfield Interceptor 650 यांसारख्या बाइकसोबत ‘होंडा सीबी 300 आर’ची टक्कर असणार आहे. अडीच लाख रुपयांच्या आसपास या बाइकची किंमत असण्याची शक्यता आहे.