|Friday, October 18, 2019
You are here: Home » Top News » साधू संतांचे अच्छे दिन येणार ; सरकार पेन्शन देणार

साधू संतांचे अच्छे दिन येणार ; सरकार पेन्शन देणार 

ऑनलाईन टीम / लखनऊ :

अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीस विलंब होत असल्याने संतप्त झालेल्या साधू संतांना शांत करण्यासाठी उत्तर प्रदेशचे योगी सरकार नवा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. साधू संतांना पेन्शन देण्याचा विचार सरकारकडून सुरू आहे. यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त साधू संतांपर्यंत पोहोचण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.

आतापर्यंत राज्य सरकारकडून साधू संतांना पेन्शन दिली जात नव्हती. साधू संतांकडे कागदपत्रे नसल्याने त्यांना आतापर्यंत पेन्शनचा लाभ मिळत नव्हता, अशी माहिती सरकारमधील सूत्रांनी दिली. मात्र आता प्रत्येक जिल्ह्यात यासाठी शिबिराचे आयोजन करण्याचा निर्णय योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. त्यामुळे वृद्धावस्थेतील साधू संतांना पेन्शन मिळू शकेल. राम मंदिरावरुन आक्रमक झालेल्या साधू संतांना शांत करण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलण्याचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.