|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » Top News » हर्सूल कारागृहात कैद्याचा संशयास्पद मृत्यू ; कारागृह अधीक्षकांवर गुन्हा दाखल

हर्सूल कारागृहात कैद्याचा संशयास्पद मृत्यू ; कारागृह अधीक्षकांवर गुन्हा दाखल 

ऑनलाईन टीम / औरंगाबाद :

औरंगाबादच्या हर्सूल कारागृहातील योगेश राठोड या कैद्याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी अखेर कारागृह अधीक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय पोलीस महासंचालकांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिल्याचेही समजते. पण जोपर्यंत कारगृह अधिक्षकांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मृताच्या पत्नीने आणि नातलगांनी घेतली आहे. 24 तास उलटूनही योगेशच्या मृतदेहावर नातेवाईकांनी अद्याप अंत्यसंस्कार केलेले नाहीत. तेथील परिस्थिती तणावपूर्ण आहे.

 

शनिवारी रात्री उशीरा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान योगेशचा मृत्यू झाला होता. पण योगेशचा मृत्यू कारागृहातील पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला असा गंभीर आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला होता. जोपर्यंत योगेशच्या मृत्यू प्रकरणी कारागृह अधिक्षकाविरोधत हत्येचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे, त्यामुळे कालपासूनच घाटी रुग्णालयात तणावाची परिस्तिथी आहे. पोलिसांचा मोठा फौजफाट तैनात करण्यात आला आहे..

 

Related posts: