|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाचे काम सुरू

मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाचे काम सुरू 

ऑनलाईन टीम / नाशिक :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामाला अखेर सुरवात झाली आहे. दहा जिह्यातून जाणाऱया या महामार्गाच्या भूसंपादनाला नाशिक जिह्यातील शेतकऱयांनी कडाडून विरोध केला होता. त्यांना पाचपट मोबदला देऊन विकासाचा महामार्ग म्हणून ज्याचे प्रमोशन केले जात आहे, त्याच समृद्धी महामार्गाच्या कामाला काही दिवसांपासून सुरवात करण्यात आली आहे.

नाशिक जिह्यातील सिन्नर तालुक्मयात मोठमोठय़ा मशिनरी, गाडय़ा, मोठय़ा संख्येने कामगार दाखल झाले आहेत. सपाटीकरण, रस्त्याचे मार्किंग, मशिनरी जोडणे, मुरुम टाकून कच्चा रस्ता बनविणे अशा वेगवेगळय़ा कामांना सुरवात करण्यात आली आहे. तसेच वावी आणि गोंदे या दोन गावांच्याजवळ जंक्शन तयार करण्यात आले आहे. अडीच वर्षात महामार्गाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट डोळय़ासमोर ठेऊन जलदगतीने कामाला सुरुवात झाली आहे.

समृद्धी महामार्ग हा एकूण 701 किमीचा महामार्ग आहे. शिव मडका ते वडपे यादरम्यान महामार्गाचे काम टप्याटप्याने सुरु होणार आहे. नागपूर-मुंबई दृतगती शीघ्र संचार मार्ग या नावे सध्या हा मार्ग ओळखला जात आहे. नाशिकसह राज्यभरातील 10 जिह्यातून या रस्त्याचा मार्ग असेल. नाशिकच्या सिन्नर आणि इगतपुरी या दोन तालुक्मयातच महामार्गाची 101 किलोमीटरची लांबी आहे. त्यासाठी सिन्नर तालुक्मयातील 26 तर इगतपुरी तालुक्मयातील 23 गाव आणि दहा हजारांहून अधिक शेतकऱयांचे 929.64 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. इगतपुरी तालुक्मयात 40 किलोमीटर तर सिन्नरमध्ये 61 किलोमीटर लांबीचा महामार्ग जाणार आहे. 120 मीटर रुंद हा रस्ता असेल. सहा पदरी महामार्गाचा डिझाईन स्पीड लक्षात घेऊन रस्त्याचे काम सुरू झाले आहे. रस्त्याला कुठेही शार्प टर्न येणार नाहीत, सहज वळण घेता येईल अपघात होणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे.