|Monday, February 24, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » बांगला देश सीमेवर 31 रोहिंग्यांना अटक

बांगला देश सीमेवर 31 रोहिंग्यांना अटक 

अगरतळा

बांगला देशातून भारतात बेकायदा घुसू पाहणाऱया 31 रोहिंग्यांना अटक करण्यात आली असून सीमा सुरक्षा दलाने त्यांना त्रिपुरा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 18 जानेवारीपासून ते भारतात घुसण्याचा प्रयत्न करीत होते. सीमाभागातील  निर्मनुष्य प्रदेशात त्यांना पकडण्यात आले. बांगला देश त्यांना परत घेण्यास तयार नसल्याने त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, असे सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी ब्रिजेश कुमार यांनी स्पष्ट केले. आणखी 30 रोहिंग्या घुसण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे त्यांना रोखण्याची सज्जता करण्यात आली आहे. यंदा बांगला सीमेवरून घुसखोरीच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसत आहे, अशीही टिप्पणी पत्रकारांशी बोलताना केली. रोहिंग्या मुस्लीमांना म्यानमार देशातून घालवून देण्यात आल्याने ते भारतात घुसण्याचा प्रयत्न करीत आहेत. म्यानमारमधून घालविण्यात आलेले रोहिंग्या बांगला देशातील छावण्यांमध्ये रहात आहेत. मात्र ते मूळचे बांगला देशातील असूनही तो देश त्यांना समावून घेण्यास तयार नाही, अशी स्थिती असल्याचे सांगण्यात येत आहे.

Related posts: