|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » Top News » दोन ट्रकची समोरासमोर धडक ; दोन ठार,तीन जखमी

दोन ट्रकची समोरासमोर धडक ; दोन ठार,तीन जखमी 

ऑनलाईन टीम / जळगाव :

शहरापासून 5 किमी अंतरावर असलेल्या तरसोद फाटय़ाजवळ दोन ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात दोन जण जागीच ठार तर तीन गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरूवारी सकाळी 8 वाजेदरम्यान घडली. मृतांमध्ये चालक पोपट पांडुरंग पठारे तसेच गयरू गमीर पिंजारी यांचा समावेश आहे. या व्यतिरीक्त तीन जखमी असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प होती. भुसावळ व जळगाव शहराकडे वाहतूक जाम झाली होती. लांबपर्यंत वाहनांची रांग लागली होती.

Related posts: