|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » उद्योग » आयआरएफ, आयटीसी व येस बँकेच्या कामगिरीने बाजार सावरला

आयआरएफ, आयटीसी व येस बँकेच्या कामगिरीने बाजार सावरला 

सेन्सेक्सची 87 अंकानी वधार, येस बँकेची समाधानकारक कामगिरी

वृत्तसंस्था/ मुंबई

सलग दोन दिवसाच्या घसरणील गुरुवारी पुर्ण विराम मिळाला आहे. त्यात भारतीय बाजारात आलेली मरगळ आज झटकून देण्यात यश मिळाले आहे. आरआयएल आयटीसी आणि येस बँक यांच्या कामगिरीने बाजार सावरला आहे. बीएसईचा प्रवास 260 अंकावर झाला त्यामुळे समाधानकारक शेअर्सची खरेदी झाल्याने त्याच सकारात्मक नफा उचलण्यात सेन्सेक्सला यश मिळाले.

बीएसई सेन्सेक्स 36,146.55 अंकानी सुरुवातीला उच्चांक घेतला तर काही दबावाचे वातावरण सोडल्यास सेन्सेक्स 35,996.68 टप्पा पार करण्यात यश मिळाले. दिवसभरातील व्यवहारात रिलायन्स इंडस्ट्रीज, येस बँक , आयटीसी आणि स्टेट बँक यांच्या निर्देशांकात 8.39 अंकानी तेजी नोंदवत बाजाराने आपली कामगिरी समाधानकारक ठेवली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजारात 18.30 अंकानी तेजी नोंदवत 10,849.80 वर बंद झाला आहे.

दिग्गज कंपन्यांमध्ये टाटा मोटर्स, सन फार्मा, कांल इंडिया आणि बजाज ऑटो यांच्या निर्देशांकात गुरुवारी मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. यांच्या निर्देशांकात जवळपास 2.27 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

येस बँकेच्या सीईओ पदावर सध्या कार्यरत असणारे राणा कपूर यांच्या जागी डॉय बँकेचे प्रमुख रनवीत गिल यांची नियुक्त करण्यासाठीची घोषणा करण्यात आली आहे. त्यासंदर्भात अंतिम निर्णय येत्या 29 जानेवारीला घेण्यात येणार आहे. परंतु या घडामोडीचा फायदा भारतीय बाजाराला झाल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे येस बँकेच्या शेअर्स खरेदी झाल्याचे पहावयास मिळाले. मागील दोन सत्रात झालेल्या घसरणीमुळे 470 अंकाचे नुकसान झाल्याची नोंद यादरम्यान करण्यात आली.

देशांतर्गत कंपन्यांमध्ये झालेल्या उलाढालीचा फायदा आगामी काळात भारतीय बाजारा घेणार का, केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदीचा कोणत्या घटकाला फायदा होणारा त्याचे पडसाद आता येणाऱया काळातच ठरणार असल्याचे मत तज्ञांकडून मांडण्यात येत आहेत.

Related posts: