|Sunday, August 25, 2019
You are here: Home » Top News » व्हिडीओकॉन कर्जप्रकरणी सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याची बदली

व्हिडीओकॉन कर्जप्रकरणी सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याची बदली 

ऑनलाईन टीम /  नवी दिल्ली :

आयसीआयसीआय बँक-व्हिडीओकॉन कर्जगैरव्यवहारप्रकरणी चौकशीला विलंब केल्यामुळे आणि या प्रकरणाच्या चौकशीबाबतची माहिती फोडल्याच्या संशयावरून केंद्रीय अन्वेषण शाखेने (सीबीआय) तपास अधिकाऱ्याची बदली केली आहे. पोलीस अधिक्षक सुधांशू धर मिश्रा असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. परंतु सीबीआयकडून या बातमीला कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष व्ही. एन. धूत यांच्याविरोधात 22 जानेवारी रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मिश्रा यांची सीबीआयच्या रांची येथील आर्थिक गुन्हे कक्षात बदली करण्यात आली आहे. मिश्रा यांच्या बदलीनंतर मोहित गुप्ता यांनी सूत्रे हाती घेतली असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान कोणतेही कारण न देता या कर्जगैरव्यवहाराची प्राथमिक चौकशी प्रलंबित ठेवल्याचा तसेच सीबीआयचे छापे आणि त्या संदर्भातील इतर माहिती फोडल्याचा आरोप मिश्रा यांच्यावर सीबीआयने केला आहे.