|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मुलांनो, तीन दिवस धमाल करायची

मुलांनो, तीन दिवस धमाल करायची 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

  मुलांनो, कोल्हापूरात तीन दिवस भरपूर फिरायचे आणि फुल्ल धमाल करायची असे, प्रतिपादन वाडय़ा वस्त्यातील मुलांना संबोधून संवेदना सोशल फौंडेशनचे अध्यक्ष राहूल चिकोडे यांनी केले. हिल रायडर्स ऍण्ड हायकर्स ग्रुप, संवेदना सोशल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसीय कोल्हापूर शहराचे दर्शन या विद्यार्थ्यांच्या सहलीचे आयोजन केले आहे.

  राहूल चिकोडे यांच्या हस्ते याचे उद्घाटन भवानी मंडपात शुक्रवारी करण्यात आले. तसेच यावेळी पुष्पगुच्छ देवून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यामध्ये शाहुवाडी, आजरा, राधानगरी, चंदगड, गगनबावडा, पन्हाळा अशा 32 वाडय़ा वस्त्यातील 265 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

  सहलीमध्ये विद्यार्थ्यांना दि. 25 ते दि. 27 दरम्यान शहरातील प्रेक्षणिक स्थळांबरोबरच धार्मिक स्थळांची माहिती दिली जाणार आहे. तसेच पन्हाळा गड आणि तेथील स्थळांची भेट घेण्यात येणार आहे. शनिवारी (दि. 26) प्रजासत्ताक दिनानिमित्त शाहू स्टेडियम येथे बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. तर मनोरंजन म्हणून त्यांना चित्रपट दाखविण्यात येणार आहे. शिवाजी विद्यापीठ येथे त्यांच्या राहण्याची सोय केली आहे. यावेळी जुना राजवाडा पोलीस निरीक्षक मानसिंग खोत, हिल रायडर्सचे प्रमोद पाटील यांची प्रमुख तर भोला यादव, शिवतेज पाटील, श्रावणी पसारे, किमया लोनकर आदींची उपस्थिती होते.

 

मुलींची संख्या अधिक

कोल्हापूर सहलीच्या तीन दिवसीय उपक्रमात 265 मुला-मुलींचा सहभाग आहे.  यामध्ये निम्म्याहून अधिक मुलींचा सहभाग आहे. त्यांचा वाढलेला प्रतिसाद पाहून उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले.

Related posts: