|Monday, January 27, 2020
You are here: Home » Top News » …अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगेचेच भाषण थांबवले

…अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगेचेच भाषण थांबवले 

ऑनलाईन टीम / सुरत :

आज सुरत मधील एका सभेवेळी कॅमेरामन चक्कर येऊन बेशुद्ध झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी लागलीचेच आपले भाषण थांबविले आणि अधिकाऱयांना तातडीने अ‍Ÿम्बुलन्स आणण्यास सांगितले.

नरेंद्र मोदी हे आज सुरतच्या दौऱयावर होते. तेथे मोदी यांनी सुरत विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे भूमीपूजन केले. यावेळी आयोजित सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी कॅमेरामन किशन रमोलिया यांना चक्कर येऊन खाली पडले. हे पाहताच मोदींनी भाषण थांबवत अधिकाऱयांना रुग्णवाहिका आणण्याचे आदेश दिले. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून या कॅमेरामनला उचलून उपचारासाठी नेण्यात येत असल्याचे आणि मोदी उभे राहिल्याचे दिसत आहे. यानंतर मोदी यांनी आपले भाषण पूर्ण केले.

Related posts: