|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » उद्योग » व्यवस्थेविरोधात बंड पुकारलेला ‘आसूड’

व्यवस्थेविरोधात बंड पुकारलेला ‘आसूड’ 

सरकारी व्यवस्थेतील अनास्थेला अनेक जण कंटाळलेले असतात. त्याविरोधात आवाज उठवून, प्रसंगी व्यवस्था बदलण्यासाठी शिकलेला एक तरुण जेव्हा आसूड उगारतो तेव्हा ही व्यवस्था कशी निराधार ठरते हे दाखविणारा ‘आसूड’ हा राजकीयपट येत्या 8 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. गोविंद प्रॉडक्शन प्रस्तुत ‘आसूड’ चित्रपटाची निर्मिती डॉ. दीपक मोरे यांची असून लेखन-दिग्दर्शन निलेश रावसाहेब जळमकर यांचे आहे.

 समाजात वावरताना नशिबी येणारी हतबलता सामान्य माणसांना बंड करायला प्रेरित करते. अशाच एका बंडाची कथा दाखवताना राजकीय नेते, त्यांचे पक्षीय राजकारण, त्यात गुंतलेले आर्थिक हितसंबध, प्रसारमाध्यमे, त्यांची भूमिका आणि त्यातून सामान्यांची होणारी घुसमट दाखवण्याचा प्रयत्न ‘आसूड’मध्ये केला आहे. शेतकरी कुटुंबातील बीएससी ऍग्रीकल्चर झालेला पण तरीही शेतीविषयी प्रचंड अनास्था बाळगणारा कथेचा नायक शिवाजी शेतीव्यवस्थेचा प्रश्न सोडवायला निघतो. शिवाजी या बदलासाठी साम, दाम, दंड, भेद वापरत व्यवस्थेविरोधात बंड पुकारत प्रत्येक शेतकऱयाला कशा पद्धतीने लढाईचा मंत्र देतो याची कहाणी आसूडमध्ये पाहायला मिळणार आहे.

 विक्रम गोखले, प्रदीप वेलणकर, माधव अभ्यंकर, अनंत जोग, दीपक शिर्पे यांच्यासोबतच अमित्रीयान पाटील आणि रश्मी राजपूत ही आघाडीची जोडी या चित्रपटात झळकणार आहेत. संगीतकार अनु मलिक यांनी आसूडच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटासाठी संगीत दिले आहे.