|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » यंदा साखरेची गोडी कमी

यंदा साखरेची गोडी कमी 

दत्तात्रय जाधव / पुणे

मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या हंगामात देशभरातील साखरेचे उत्पादन 5 ते 6 टक्क्यांनी घटणार आहे. मागील हंगामात साखरेचे उत्पादन 325 लाख टन झाले होते. मात्र, यंदाच्या हंगामात अंदाजे 307 लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या वतीने वर्तविण्यात आला आहे.

31 जानेवारी 2019 पर्यंत देशभरात 514 साखर कारखान्यांनी 185.19 लाख टन साखरेची निर्मिती केली आहे. त्या तुलनेत मागील हंगामात 504 कारखान्यांनी 171.23 लाख टन साखरेची निर्मिती केली होती. महाराष्ट्रात यंदा लवकर कारखाने सुरु झाल्याने 31 जानेवारी 2019 पर्यंत साखरेचे उत्पादन 70.70 लाख टन झाले. त्या तुलनेत गेल्या वषी याच कालावधीत 63.08 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. चालू 2018-19 च्या हंगामात 191 साखर कारखाने महाराष्ट्रात चालू असून, मागील हंगामात 182 साखर कारखाने सुरू होते. त्यामुळे यावषी महाराष्ट्रातील साखर उत्पादन मागील वर्षाच्या वास्तविक उत्पादनापेक्षा कमी आहे.

उत्तर प्रदेशमध्ये या हंगामात 117 साखर कारखाने चालू असून, त्यांनी 31 जानेवारी 2019 पर्यंत 53.36 लाख टन साखरेची निर्मिती केली आहे. त्या तुलनेत गेल्या वषी याच महिन्यात 119 कारखान्यांनी 53.98 लाख टन उत्पादन केले होते. गेल्या वषी साध्य झालेल्या हंगामापेक्षा साखर पुनर्प्राप्ती ही 0.81 … जास्त आहे.

कर्नाटकच्या बाबतीत 31 जानेवारी 2019 पर्यंत 65 साखर कारखान्यांनी 33.40 लाख टन उत्पादन केले आहे, तर मागील वषी 58 साखर कारखान्यांनी 26.78 लाख टन उत्पादन केले होते. तामिळनाडूतील 29 साखर कारखान्यांनी   3.10 लाख टन साखरेची निर्मिती केली आहे. त्या तुलनेत 2017-18 च्या हंगामात 30 साखर कारखान्यांनी 2.12 लाख टन साखर उत्पादित केली होती.

गुजरातने 31 जानेवारी 2019 पर्यंत 6.50 लाख टन साखरेची निर्मिती केली असून, सध्या 16 साखर कारखाने चालू आहेत. गेल्या वषी 17 साखर कारखाने कार्यान्वित होते, त्यांनी 31 जानेवारी 2018 पर्यंत 6.07 लाख टन साखरेची निर्मिती केली होती. आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये 24 साखर कारखान्यांनी 31 जानेवारी 2019 अखेर 3.70 लाख टन उत्पादन केले होते. त्या तुलनेत गेल्या वषीच्या याच हंगामात या कारखान्यांनी 3.80 लाख टन उत्पादन केले होते.

बिहार, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये 31 जानेवारी 2019 अखेर साखर उत्पादन अनुक्रमे 4.08 लाख टन, 1.75 लाख टन, 2.90 लाख टन, 2.90 लाख टन आणि 2.60 लाख टन झाले आहे, असे या अहवालात नमूद केले आहे.

Related posts: