|Monday, September 23, 2019
You are here: Home » मनोरंजन » आयफोनवर शूट होणार सईचा ‘पाँडेचरी’

आयफोनवर शूट होणार सईचा ‘पाँडेचरी’ 

सई ताम्हणकरच्या ‘पाँडेचरी’ या चित्रपटाचे चित्रीकरण 1 फेब्रुवारीपासून पाँडेचरीमध्ये सुरू झाले आहे. चित्रिकरणाच्या पहिल्याच दिवशी सईचे पोस्टरही रिविल करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये सईचा ब्लॅक अँड व्हाइट नो मेकअप लूक उठून दिसतो आहे. ही पहिली फिल्म आहे जी आयफोनवर शूट करण्यात येणार आहे. माझ्या भूमिकेचा लूक खूप नॅचरल आहे. नो मेकअप, नो हेअरस्टाइल लूकमध्ये मी यात दिसेन. प्रत्येक अभिनेत्रीच्या आयुष्यात अशी फिल्म यायला हवी, जेव्हा तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर निघून काहीतरी वेगळं करता, असे यावेळी सई म्हणाली. सचिन कुंडलकर आणि सई ताम्हणकर यांचा हा एकत्र दुसरा चित्रपट आहे.