|Sunday, January 26, 2020
You are here: Home » मनोरंजन » मिका सिंगचा ‘डोक्याला शॉट’

मिका सिंगचा ‘डोक्याला शॉट’ 

‘डोक्याला शॉट’ नावाचा एक धमाल कॉमेडी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या सिनेमामध्ये प्रेक्षकांना एक सरप्राइज मिळणार आहे आणि ते म्हणजे  बॉलीवूडमध्ये आपल्या भारदस्त आवाजामुळे ओळखला जाणारा आणि असंख्य लोकप्रिय हिंदी गाण्यासाठी आपला आवाज देणाऱया मिका सिंगने चित्रपटाच्या शीर्षक गीताला आवाज दिला आहे. मराठीमधील अनेक हिट गाण्यांना संगीत देणाऱया अमितराज यांनी शीर्षक गीताला संगीतबद्ध केले आहे. उत्तुंग ठाकूर यांना या उडत्या चालीच्या आणि मस्ती मूड अशा गाण्याला वेगळा आणि मराठीमध्ये आजवर कधीही न ऐकलेला असा आवाज पाहिजे होता. म्हणून त्यांनी मिका सिंग यांचे नाव अमितराज यांना सुचवले आणि अमितराज यांनीही या नावाला संमती दर्शवली. यानिमित्ताने मिका सिंग मराठी सिनेसफष्टीत पदार्पण करत आहे. ‘डोक्याला शॉट’ हा चित्रपट 1 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Related posts: