|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » Top News » मोदींच्या द्वेषावर माझे प्रेम भारी पडले ; राहुल गांधी

मोदींच्या द्वेषावर माझे प्रेम भारी पडले ; राहुल गांधी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

साध्या देशात दोन विचारसरणींमध्ये लढा सुरू आहे. एका बाजूला भाजपा-संघाची विचारधरा आहे, तर दुसऱया बाजूला काँग्रेसची विचारसरणी आहे, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले. अजमेरमध्ये सेवादलाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपा आणि संघ द्वेष पसरवतो. आम्ही मात्र प्रेमच पसरवतो. मोदी शिव्या देतात. काँग्रेस संपवायची भाषा करतात. मात्र मोदींच्या द्वेषावर माझे प्रेम भारी पडते आहे, असे राहुल गांधी सेवादलाला संबोधित करताना म्हणाले.

  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आक्रमक पविर्त्यात आहेत. राफेल विमान खरेदी करारावरुन राहुल दररोज मोदींना लक्ष्य करत आहेत. याशिवाय सोशल मीडियावरुनही ते सतत मोदींना लक्ष्य करत आहेत. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने राहुल गांधी राजस्थान आणि गुजरातच्या दौऱयावर आहेत. या दोन राज्यांमध्ये ते अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील आणि जनसभांना संबोधित करतील. राजस्थानात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या विधनसभा निवडणुकीत कंग्रेसने विजय मिळवला आहे. याशिवाय जवळपास सव्वा वर्षांपूर्वी झालेल्या गुजरात विधनसभेच्या निवडणुकीतही काँग्रेसने भाजपाला टक्कर दिली होती.

Related posts: