|Sunday, April 21, 2019
You are here: Home » Top News » भर स्टोजवर महिलेने राहुल गांधींना केले ‘किस’

भर स्टोजवर महिलेने राहुल गांधींना केले ‘किस’ 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज गुजरात राज्यातील वलसाड येथील सभेसाठी मंचावर पोहोचल्यानंतर एका महिलेने राहुल यांचे चक्क चुंबन घेत स्वागत केले. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे राहुल यांना काय करावे हेच सूचत नव्हते.

    राहुल यांचे मंचावर आगमन झाल्यानंतर माइकवर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यावेळी महिलांचा एक गट मंचावर आला. महिला आपल्या स्वागताला येत आहेत हे पाहून राहुल त्यांचा मान राखण्यासाठी उठून उभे राहिले. त्याचवेळी सर्वात पुढे असलेल्या महिलेने राहुल यांच्या गालावर चुंबन घेतले. राहुल यांनी स्मित केले. त्यानंतर महिलांनी राहुल यांच्या गळय़ात पुष्पमाला घातली.

 

 

Related posts: