|Friday, February 28, 2020
You are here: Home » Top News » पाकिस्तानला धडा शिकवा, 40च्या बदल्यात 40 हजार : जितेंद्र आव्हाड

पाकिस्तानला धडा शिकवा, 40च्या बदल्यात 40 हजार : जितेंद्र आव्हाड 

ऑनलाईन टीम / मुंबई :

पुलवामा येथील भ्याड हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. अत्यंत दुर्दैवी असा हा हल्ला आहे. या हल्ल्याचा निषेध करत असतानाच पाकिस्तानला या हल्ल्याची जबदस्त किंमत मोजायला लावायची असा निर्धार आपण केला पाहिजे. 40 च्या बदल्यात 40 हजार असे धोरण असले पाहिजे असे मत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर त्यांनी हा व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीचा मथळा हाच आहे की ‘पाकिस्तानला धडा शिकवा, 40 च्या बदल्यात 40 हजार’ पाकिस्तानात पुरस्कृत अतिरेक्मयांनी हा हल्ला केला आहे. या हल्ल्यात जे जवान शहीद झाले त्यांच्या कुटुंबीयांना सावरण्याची ताकद इश्वराने त्यांना द्यावी अशी प्रार्थनाही आव्हाड यांनी केली आहे. इतकंच नाही तर या हल्ल्याला आपण त्याच भाषेत उत्तर द्यायला हवं असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानला या हल्ल्याची जबरदस्त किंमत मोजायला लावलीच पाहिजे ही सगळय़ा भारतीयांची भावना आहे. इथे आपण राजकारण बाजूला ठेवू, मात्र काश्मिरी तरूण वाट सोडून दहशतवादाकडे का वळत आहेत याचं सुद्धा आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

 

Related posts: