|Monday, September 23, 2019
You are here: Home » leadingnews » नौशेरात सेक्टरमध्ये आयईडीचा स्फोट ,एक अधिकारी शहीद

नौशेरात सेक्टरमध्ये आयईडीचा स्फोट ,एक अधिकारी शहीद 

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून अद्यापही दहशतवादी कारवाया सुरु असल्याचे दिसत आहे. नौशेरा सेक्टरमध्ये आयईडीचा स्फोट झाला आहे. या स्फोटात एक अधिकारी शहीद झाला असून एक जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

नियंत्रण रेषेवर तपासणी सुरु असताना हा स्फोट झाला असल्याचे कळत आहे. दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेवर आयईडी ठेवला होता. आयईडी नियंत्रण रेषेपासून 1.5 किमी अंतरावर पेरण्यात आले होते. तो निकामी करत असताना स्फोट होऊन मेजर पदावरील अधिकारी शहीद झाला. तब्बल 350 किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्मयाने गुरुवारी पुलवामा जिह्यात चढविलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 40 जवान शहीद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून सगळीकडे कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.