|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » लोकसभा निवडणूक लढणार नाही ; रजनीकांत यांनी केली घोषणा

लोकसभा निवडणूक लढणार नाही ; रजनीकांत यांनी केली घोषणा 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

नव्या राजकीय पक्षाची स्थापना करून तामिळनाडूसह देशाचे लक्ष वेधून घेणारे दाक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांनी लोकसभा निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली आहे. ‘मी किंवा माझा पक्ष आगामी लोकसभा निवडणूक लढणार नाही. तसेच, कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही,’ अशी घोषणा रजनीकांत यांनी केली आहे.

जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी अभिनेते कमल हसन यांनी राजकीय आखाड्यात उडी घेत पक्षाची स्थापना केली. त्या पाठोपाठ रजनीकांत यांनीही राजकारण प्रवेशाचा निर्णय घेतला व ‘रजनी मक्कल मंद्रम’ (आरएमएम) या पक्षाची स्थापना केली. त्यामुळे आगामी निवडणुकीत तामिळनाडूत ‘स्टार वॉर’ पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, रजनीकांत यांनी अनपेक्षितरित्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. तामीळ भाषेत एक निवेदन प्रसिद्ध करून त्यांनी आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे. आगामी निवडणुकीत ‘आरएमएम’ कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देणार नाही. त्यामुळे मीडियाने किंवा कोणत्याही पक्षाने माझी, माझ्या पक्षाच्या चिन्हाची वा रजनी फॅन क्लबची छायाचित्रे कुठेही वापरू नयेत, असे त्यांनी बजावले आहे. केंद्रात स्थिर व मजबूत सरकार देऊ शकेल व तामिळनाडूचा पाण्याचा प्रश्न सोडवू शकेल अशा पक्षालाच मते द्या, असे आवाहन त्यांनी चाहत्यांना केले आहे.