|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » महाराष्ट्र स्वाभिमानचा सुंदरवाडी महोत्सव रद्द

महाराष्ट्र स्वाभिमानचा सुंदरवाडी महोत्सव रद्द 

वार्ताहर / सावंतवाडी:

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे सावंतवाडी येथे 23 व 24 फेब्रुवारी या कालावधीत सुंदरवाडी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. मात्र, जम्मू काश्मिर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. त्यामुळे हा महोत्सव रद्द करण्यात येत असून पुढे घेण्यात येईल, असे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी स्पष्ट केले. परब म्हणाले, जम्मू-काश्मिर पुलवामा येथे सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले आहेत. त्यामुळे सुंदरवाडी महोत्सव रद्द करून पुढील तारखेला घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. जम्मू काश्मिरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष निषेध करीत आहे.