|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » जागवण्या शौर्याचा इतिहास दौडताहेत 12 मराठे वीर

जागवण्या शौर्याचा इतिहास दौडताहेत 12 मराठे वीर 

प्रतिनिधी /सातारा :

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा जाणण्यासाठी 6 मराठा लाईट इन्फंट्रीचे 12 जवान हजार किलोमीटरच्या सायकल मोहिमेस निघाले असून सातारा जिल्हय़ात त्यांचे आगमन झाले तेव्हा सैनिक स्कूल सातारा येथे जवानांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास जागवण्यासाठी हे जवान सायकलवरुन दौड मारत असून या मोहिमेत ते विविध किल्ल्यांना भेटी देत छत्रपतींच्या पराक्रमाला वंदन करत आहेत.

सहा मराठा लाईट इन्फंट्री सागर मध्यप्रदेश बटालियनच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त सायकल मोहीम आयोजित केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथाना उजाळा देऊन आजी-माजी सैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करणे असे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या मोहिमेची सुरुवात 11 फेब्रुवारी 2019 रोजी ब्रिगेडियर अतुलकुमार ढाणा मिल्ट्री स्टेशन मध्यप्रदेश यांच्या हस्ते झेंडा निशाणी दाखवून झाली.

या मोहिमेची सांगता जनरल ऑफिसर कमांडिंग सीओसी शहाबाज डिव्हिजन सागर मिल्ट्री स्टेशन मध्यप्रदेश येथे 25 फेब्रुवारी 2019 रोजी होणार आहे. या मोहिमेतील बारा सायकल स्वार जवान महाराष्ट्र राज्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य गाथेने आणि पुलकित झालेल्या विविध गड किल्ल्यांना सश्रद्ध विनम्रतापूर्वक भेटी देत आहेत.

 हे बारा जवानांचे पथक सागर येथून (मध्यप्रदेश) निघून सोमवारी पुण्यात पोहोचले. तेथे त्यांची सायकल मोहीम सिंहगड, राजगड, तोरणा रायगड यांना सादर भेटी देऊन सातारा जिह्यातील चंदन-वंदन, वैराटगड, अजिंक्यतारा, सज्जनगड, वसंतगड या ऐतिहासिक किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य स्मृतीचा जागर करणार आहेत. सातारा जिह्यातील या मोहिमेदरम्यान त्यांचे वास्तव्य सैनिक स्कूल सातारा येथे असणार आहे. यानंतर ही मोहीम कोल्हापूर जिह्यातील पन्हाळा विशालगड या दुर्गावरती आपल्या देशाच्या भ्रमण करणार आहेत.

Related posts: