|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » हल्लेखोर अदिल अहमदची गेंदवलेकरांनी काढली प्रेतयात्रा

हल्लेखोर अदिल अहमदची गेंदवलेकरांनी काढली प्रेतयात्रा 

प्रतिनिधी /म्हसवड :

निम का पत्ता कडवा है, पाकिस्तान भडवा है, पाकिस्तान मुर्दाबाद अशा संतप्त घोषणा देत पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी अदील अहमदची अंत्ययात्रा काढून पुतळ्याचे दहन केले. यामध्ये सहभागी झालेल्या गोंदवलेकरांनी पाकिस्तान विरोधी घोषणा देत संताप व्यक्त केला.

पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी धैर्यशील पाटील यांनी हाक दिली होती. या हाकेला उत्स्फूर्त साथ देत येथील आप्पा महाराज समाधी मुख्य चौकात आज सकाळी अकरा वाजता गोंदवलेकर एकवटले. या हल्ल्यात सहभागी असणाऱया आदिल अहमदच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालून तिरडीवर झोपवून गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. वंदे मातरम बरोबरच पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी यावेळी सारा परिसर दणाणून गेला होता. या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांमधून या हल्ल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत होत्या.

यावेळी जेष्ठ नेते बाळासाहेब माने, सरपंच अश्विनी कट्टे, उपसरपंच संजय माने, सयाजीराव पाटील, बाळासाहेब पाटील, अंगराज कट्टे, विष्णुपंत कट्टे, तानाजी कट्टे, सतीश अवघडे, श्रीकृष्ण कट्टे, सुरज पाटील, राजेंद्र कट्टे, रफिक तांबोळी, वसीम तांबोळी, सुभाष गुंजवटे यांच्यासह मोठय़ा संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.