|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » चोरटय़ांच्या दोन टोळीकडून 1.60 लाखांचे मोबाईल जप्त

चोरटय़ांच्या दोन टोळीकडून 1.60 लाखांचे मोबाईल जप्त 

प्रतिनिधी /मडगाव :

मडगावच्या चोर बाजारात सामान विकण्यासाठी आलेल्या चोरटय़ांच्या एका टोळीला कोलवा पोलिसांनी अटक केली. या चोर बाजारापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या दुसऱया एका टोळीकडून मडगाव पोलिसानी अटक केली.

मडगाव पोलिसांनी 49 हजार रुपये किंमतीचा तर कोलवा पोलिसांनी सुमारे 1,61,200 रुपये किंमतीचे मोबाईल व इतर इलेक्ट्रीकल वस्तू जप्त केल्या.

दोन्ही टोळीतील एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

पहिली टोळी मूळ कर्नाटकातील

कोलवा पोलिसांनी अटक केलेल्या पहिल्या टोळीतील तिघेही मूळ कर्नाटकातील व सध्या खारेबांद – मडगाव येथील राहणारे आहेत. संशयित आरोपींची नावे रवी हनुमंत गोसावी, अनिल चंदा गोसावी आणि जावेद साबर अली अशी आहेत.

मडगावच्या चोर बाजारात महागडे किमतीचे मोबाईल विक्रीस येणार असल्याची कुणकूण गुप्त पोलिसांना लागली होती आणि त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. कोलवा आणि मडगाव पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

कोलवा पोलीस स्थानकाच्या हृद्दीत अनेक मोबाईलची चोरी झाली होती आणि त्यासंबंधीच्या तक्रारी पोलीस स्थानकात आल्या होत्या. या तक्रारीच्या आधारे पोलिसानी पाळत ठेवली होती.