|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Top News » श्रीपाद छिंदमसह 70 जणांना एक दिवसाची शहरबंदी

श्रीपाद छिंदमसह 70 जणांना एक दिवसाची शहरबंदी 

ऑनलाईन टीम /अहमदनगर : 

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा अहमदनगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमसह 70 जणांना एक दिवसाची शहरबंदी करण्यात आली आहे. श्रीपाद छिंदम, त्याचा भाऊ श्रीकांत याच्यासह 70 जणांना शहरात एक दिवस बंदीची नोटीस बजावण्यात आली आहे. तोफखाना पोलिसांनी 50, कोतवाली पोलिसांनी 10 आणि भिंगार कॅम्प पोलिसांनी 10 जणांवर ही कारवाई केली आहे.

 मागील वर्षी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर श्रीपाद छिंदमने एका कामाबाबत पीडब्लूडीचे कर्मचारी अशोक बिडवे यांना फोन केला होता. यावेळी बोलताना छिंदमने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. छिंदमने महाराजांबद्दल वापरलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर सर्वच स्तरातून छिंदमवर टीका झाली. शिवरायांविषयी अवमानकारक भाष्य केल्यानंतर श्रीपाद छिंदमला हद्दपार करण्यात आले होते. 16 फेब्रुवारीला श्रीपाद छिंदमला पोलिसांनी अटक केली. छिंदमविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला तुरुंगवासही भोगावा लागला होता. छिंदमला सशर्त जामीन मंजूर झाल्यानंतर तो अज्ञातस्थळी गेला होता. राजकीय अकसापोटी मला गुंतवण्यात आल्याचे  आपल्या जामीन अर्जात त्याने म्हटले  होते.

Related posts: