|Monday, August 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पत्रकार हा साहित्यिक असला पाहिजे

पत्रकार हा साहित्यिक असला पाहिजे 

वार्ताहर /लोणंद :

लोणंद मराठी पत्रकार संघ, लोणंद आयोजित व पुरुषोत्तम जाधव जनकल्याण प्रतिष्ठाण यांच्या सौजन्याने शिवजयंतीनिमित्त निमंत्रित कविंचे राज्यस्तरीय काव्य संमेलन बुधवारी लोणंद येथील नगरपंचायत पटांगणात पार पडले. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुलवामा येथील शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले.

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रविंद्र बेडकिहाळ जेष्ठ पत्रकार व साहित्यिक हे होते, तर उदघाटन पुरुषोत्तम जाधव जनकल्याण प्रतिष्ठाणचे अध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी केले. प्रमुख उपस्थितीतांत मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, शंकरराव जाधव जेष्ठ पत्रकार, माणगंगा साहित्य परिषदेचे अध्यक्ष ताराचंद आवळे, माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके पाटील, नगरसेवक राजेंद्र डोईफोडे, स्वाती भंडलकर, हेमलता कर्णवर, शैलजा खरात, डॉ नितीन सावंत, नगरसेवक हणमंत शेळके, सागर शेळके, गजेंद्र मुसळे आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.

काव्य संमेलन होणे गरजेचे

 पत्रकार हा साहित्यिक असला पाहिजे, पत्रकार हा सामाजिक जाणीव ठेवून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी लिहितच असतो. पत्रकारांकडून साहित्याची गोडी निर्माण करणाऱया अशा या काव्य संमेलनाचे आयोजन होणे म्हणजे लोणंद मराठी पत्रकार संघाचे पडलेले हे पाऊल खरच साहित्य परंपरा जपण्याचे कार्य आहे, असे कौतुक रविंद्र बेडकीहाळ आणि पुरुषोत्तम जाधव यांनी केले.

काव्यमैफिलमध्ये कवींनी रंगत आणली

 या कार्यक्रमास प्रियंका हर्षद गांलींदे, डॉ. मनोज निकम, नवनाथ शेळके, लोणंद मराठी पत्रकार संघाचे कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट व्ही. एम. मणेर, साथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष कय्यूम मुल्ला, मराठा समाज मंडळ लोणंद आदिंनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी लोणंदचे कवि दीपक क्षीरसागर यांच्या ‘मनातून पानावर’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. अविनाश चव्हाण, किशोर धरपडे, अशोकराज दिक्षित, चंद्रवर्धन लांडगे, सोमनाथ सुतार, जनार्धन गार्डे, प्रा. दशरथ जाधव, कांताताई भोसले, शाहीर प्रमोद जगताप, सुशिल गायकवाड आदी कवी यांनी काव्यमैफिलमध्ये रंगत आणली. लकी कूपनच्या माध्यमांतून संजय जनार्दन पाटणकर यांच्याकडून भरजरी  पैठणी भाग्यवान विजेती म्हणून थोरात या महिलेस भेट तर सागर खरात यांना फोरजी टच क्रीन मोबाइल श्री मोबाइल ऍण्ड इलेक्ट्रॉनिक्सचे मालक प्रसाद ननावरे यांच्याकडून भेट देण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष अशोक गारुळे, प्रशांत ढावरे, प्रफुल्ल दोषी संतोष खरात, सुरेश भोईटे, गणेश भंडलकर, अक्षय दोशी, दिलीप वाघमारे, मंगेश माने,सुशील गायकवाड आदिंनी विशेष प्रयत्न केले.