|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » औरंगाबाद हायवेवर भीषण अपघात , तिघांचा मृत्यू तर 24 जखमी

औरंगाबाद हायवेवर भीषण अपघात , तिघांचा मृत्यू तर 24 जखमी 

ऑनलाईन टीम / अहमदनगर :

औरंगाबाद – अहमदनगर महामार्गावरील कांगोणी फाट्याजवळ पहाटे दुधच्या टँकरला भरधव वेगाने येणा-या ट्रव्हलने पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला तर ट्रव्हलमधील 24 प्रवासी जखमी झाले आहेत. संजय रामकृष्ण सावळे(वय-40 जि.बुलढाणा), आकाश सुरेश यांगड (वय-27, रा. खंडाळा ता. चिखली, जिल्हा – बुलढाणा), कल्पेश गुलाबराव व्यवहारे( वय-22, रा. सारोखपीर ता. मौताळा, जि. बुलढाणा) यांचा जागीच मृत्यू झाला.

रॉयल चिंतामणी ट्रव्हल्स कंपनीची बस पहाटेच्या सुमारास पुणेकडे चालली होती. पहाटेच्या सुमारास पुढे चाललेल्या टँकरने ट्रव्हल्सने भरधव वेगात धडक दिली. शिंगणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ललीत पांडुळे यांच्यासह कर्मचाऱयांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. जखमींना अहमदनगर येथील सिव्हील हॉस्पटिलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.