|Monday, September 16, 2019
You are here: Home » Top News » एरो इंडियाच्या शो दरम्यान भीषण आग ; 80 कार जळून खाक

एरो इंडियाच्या शो दरम्यान भीषण आग ; 80 कार जळून खाक 

ऑनलाईन टीम / बंगळुरू :

बंगळुरूतील एरो इंडिया शोदरम्यान शनिवारी मोठी दुर्घटना घडली आहे. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडय़ांना भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

पार्किंग परिसरात लागलेल्या आगीमध्ये जवळपास 80 ते 100 गाडय़ा जळाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बंगळुरूमध्ये एरो इंडिया शोचे आयोजन करण्यात आले आहे. गाडय़ा पार्किंग करण्यात आलेल्या परिसरात मोठय़ा प्रमाणात गवताच्या पेंढय़ा होत्या. या गवताच्या पेंढय़ाला आग लागल्याने गाडय़ांना आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.