|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आंगणेवाडी यात्रेसाठी आलेल्या तरुणाचा मृत्यू

आंगणेवाडी यात्रेसाठी आलेल्या तरुणाचा मृत्यू 

वार्ताहर / मालवण:

आंगणेवाडी यात्रेसाठी आलेल्या उदय दत्तात्रय सावंत (49, रा. गोरेगाव) या तरुणाचा सोमवारी सकाळी एसटी बसमध्ये प्रवासादरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. गोरेगाव येथील उदय सावंत हे आपल्या मित्रांसोबत सोमवारी सकाळी आंगणेवाडी यात्रेसाठी आले होते. आंगणेवाडीतील कणकवली बस डेपोमधील एसटी बसमध्ये ते बेशुद्ध पडल्याचे दिसून आले. त्यांना मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप यादव यांनी त्यांची तपासणी केली असता, त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांचा मृतदेह विच्छेदनासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. तपास कट्टा पोलीस दूरक्षेत्राचे रुक्मांगद मुंडे, स्वप्नील तांबे करीत आहेत.

Related posts: