|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » चोरीप्रकरणी दोघे ताब्यात

चोरीप्रकरणी दोघे ताब्यात 

एक गडहिंग्लजचा : वेंगुर्ले पोलिसांची कारवाई

वार्ताहर / वेंगुर्ले:

वेंगुर्ले सुंदरभाटले येथील कैतान पास्कू फर्नांडिस यांच्या घराच्या मागील बाजूस ठेवलेला दहा हजार रुपये किमतीचा तांब्याचा हंडा चोरीस गेल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली. याप्रकरणी वेंगुर्ले पोलिसांत दाखल गुन्हय़ानुसार दोन संशयितांना ताब्यात घेत चोरीस गेलेला हंडा ताब्यात घेण्यात आला आहे. त्यांना अटक करून वेंगुर्ले न्यायालयात हजर केले असता 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यांची रवानगी सावंतवाडी जेलमध्ये करण्यात आली.

वेंगुर्ले पोलीस ठाण्यात कैतान फर्नांडिस यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शनिवार 23 रोजी सकाळी 11 ते रविवार 24 रोजी रात्री दोन वाजण्याच्या कालावधीत आपल्या घराच्या मागील बाजूला ठेवलेला तांब्याचा हंडा गायब झाल्याचे दिसून आले. त्याची सर्वत्र शोधशोध करूनही न सापडल्याने वेंगुर्ले पोलिसांत तक्रार देण्यात आली. याप्रकरणी दीपक परशुराम गोसावी (गडहिंग्लज) आणि मारुती नीळकंठ आजगावकर (माणिक चौक, वेंगुर्ले) या दोघांविरोधात सोमवारी वेंगुर्ले  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून हंडा जप्त करण्यात आला आहे. वेंगुर्ले पोलिसांनी दोघांनाही सोमवारी वेंगुर्ले न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. अधिक तपास वेंगुर्ले पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस आर. बी. वेंगुर्लेकर करत आहेत.

Related posts: