|Monday, August 26, 2019
You are here: Home » उद्योग » विप्रोकडून भागधारकांना मिळणार बोनस शेअर्स

विप्रोकडून भागधारकांना मिळणार बोनस शेअर्स 

मुंबई :

असंख्य भागधारकांनी विप्रोला पसंती दिल्यामुळे कंपनीकडून लवकरच बोनस शेअर्स देण्यात येणार आहे. यामुळे कंपनीचे अधिकृत भागभांडवल वाढणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. भागधारकांना प्रत्येक तीन समभागांमागे एक बोनस शेअर्स देण्याचा प्रस्ताव कंपनीच्या संचालक मंडळाने जानेवारीत मंजूर केला होता. त्या प्रस्तावास बहुतांशी भागधारकांची मंजुरी मिळाली, असे कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे.

विप्रोकडून दोन रुपये मूल्याचे 700 कोटी समभाग बोनस रुपात देण्यात येणार आहेत. यामुळे विप्रोचे अधिकृत भागभांडवल 1,116 कोटी रुपयांवरून 2,526 कोटी रुपयांवर पोहोचणार आहे. डिसेंबर अखेरीस कंपनीकडे मुक्त राखीव निधी, सुरक्षित जमा ठेव आणि भांडवल राखीव निधीतून एकूण 46,847 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाले असल्याचे विप्रोने म्हटले आहे.