|Friday, October 18, 2019
You are here: Home » leadingnews » अटारीवर ‘वाघ’ परतला ; विंग कमांडर अभिनंदन यांची पाकिस्तानकडून सुटका

अटारीवर ‘वाघ’ परतला ; विंग कमांडर अभिनंदन यांची पाकिस्तानकडून सुटका 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेसाठी भारताकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठे यश आले असून, अभिनंदन यांची पाकिस्तानकडून सुटका करण्यात आली आहे. अभिनंदन यांच्या स्वागतासाठी अटारी बॉर्डरवर नागरिकांनी मोठी गर्दी केली.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी दुपारी अभिनंदन यांची सुटका करण्यात येणार असल्याची घोषणा पाकिस्तानी संसदेत केली. अभिनंदन यांना आज लाहोरला आणण्यात आले त्यानंतर पंजाबमधील अटारी बॉर्डरवर आणले तेथे त्यांचा ताबा भारताकडे देण्यात आला.

भारतीय हवाई दलाच्या विमानांनी मंगळवारी पहाटे पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकने बुधवारी सकाळी भारतात घुसखोरी केली होती. पाकच्या विमानांना पिटाळून लावताना मिग-21 चे विंग कमांडर पाकच्या हद्दीत शिरले होते. तेथे त्यांचे विमान पाडण्यात आले. पण त्यांनी लगेच पॅराशूटद्वारे खाली उडी मारली. मात्र स्थानिकांनी त्यांना पोलिसांच्या व नंतर लष्कराच्या ताब्यात दिले. त्यांच्या सुटकेची आग्रही मागणी भारताने केली होती. दुसरीकडे पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही यासाठी प्रचंड दबाव येत होता.