|Friday, February 28, 2020
You are here: Home » leadingnews » मसूद जिवंत …? नातेवाईकांच्या हवाल्याने पाकिस्तानी मीडियाच्या कोलांटउडय़ा

मसूद जिवंत …? नातेवाईकांच्या हवाल्याने पाकिस्तानी मीडियाच्या कोलांटउडय़ा 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश ए मोहम्मदचा म्होरक्मया मसूद अझहर हा भारतीय हवाईदलाने चढविलेल्या हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त रविवारी पाकिस्तानच्या माध्यमांनी दिले होते. मात्र, आता मसूदच्या नातेवाईकांचा हवाला देत मसूद जिवंत असल्याचा दावा केला आहे. तसेच जैश ए मोहम्मदने देखिल हे वृत्त फेटाळले आहे.

भारतीय हवाईदलाने 26 फेब्रुवारीला पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ठिकाण्यांवर हवाई हल्ला चढविला होता. या हल्ल्यामध्ये मसूदचा भाऊ ठार झाल्याचे वृत्त होते. मात्र, रविवारी मसूदही ठार झाल्याचे वृत्त समाज माध्यमांवर वाऱयासारखे पसरले होते. याला पाकिस्तानी माध्यमांनीही दुजोरा दिला होता. मात्र, जैश आणि पाकिस्तानी सरकार यांच्याकडून अधिकृत घोषणा झाली नव्हती. आता पाकिस्तानी माध्यमांनीही युटर्न घेतला असून मसूदच्या जवळच्या नातेवाईंकांचा हवाला देत तो जिवंत असल्याचे म्हटले आहे. या दरम्यान, मसूद अझहरच्या मृत्यूच्या वृत्तामुळे भारतीय गुप्तचर विभागही सक्रिय झाला असून या वृत्ताची सत्यता पडताळण्यात येत आहे. मसूद हा पाकिस्तानी लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याची माहिती मिळाली असल्याचे एका अधिकाऱयाने सांगितले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही मसूद आजारी असल्याचे म्हटले होते, मात्र, कुठे आहे हे माहित नसल्याचे म्हटले होते. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्मया मसूद अझहर हा पाकिस्तानातच असल्याची कबुली पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी दिली आहे. पण, त्यांचे असे म्हणणे आहे, भारताने ठोस पुरावे दिल्यासच सरकार त्याच्याविरुद्ध काही पावले उचलू शकते. दरम्यान, मसूद अझहर सध्या एवढा आजारी आहे की, घराच्या बाहेरही निघू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Related posts: